Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता वर्षाला ६ नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार ! Maharashtra Budget 2023 : Good news for farmers! Now 12 thousand rupees per year for farmer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता वर्षाला ६ नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार !

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत आहे. त्यांनी आपला अर्थसंकल्प पंचामृतावर आधारित असल्याचं म्हटलं.

फडणवीस म्हणाले की, अमृत काळातील हा राज्याचा पहिला अर्थसंकल्प असून तो पाच ध्येयांवर आधारित असून तो पंचामृताप्रमाणे आहे. त्यामध्ये पहिले अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत महिला, अदिवासी मागासवर्ग ओबीसीसंह सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास, तिसरे अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, चौथे अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम विकास, पाचवे अमृत पर्यावरण पूरक विकास असा आहे.

यावेळी फडणवीसांनी पंचामृताचे सविस्तर माहिती दिली. शाश्वत शेतीसाठी हक्काच्या मदतीची हमी आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचीच आमची भूमिका आहे. यावर्षी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

फडणवीस म्हणाले की, बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आम्ही जाहीर करतो. केंद्र सरकारच्या सहा हजारच्या निधीत राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार असून आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार आहे. याचा लाभ १ कोटी १५ शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२४-२४ वर्षासाठी ६ हजार ९०० कोटी रुपये निधी प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले.