साहेब जगायचे कसे रडत की हसत? किराणामालाच्या यादीला महागाईचा फटका

गणेश पिटेकर
Tuesday, 2 March 2021

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. काय करावे हे सुचेना!

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. तो कुठे तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आता वाढत्या पेट्रोल व डिझेलने त्याला रडकुंडीस आणले आहे. सोमवारी (ता.एक) भारत सरकारने त्यात आणखीनच भर टाकली. म्हणजे गॅस सिलिंडरच्या भावात २५ रुपयांनी वाढ केली आहे. पूर्वी गॅस ७६७ रुपया मिळत होते. ती आता ८८० रुपयाला ग्राहकांना घ्यावे लागणार आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या भावामुळे किराणामालही महागला आहे. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. ‘ई सकाळ’ने एका मेस चालकाला या महागाईबाबत विचारले असता तो म्हणाला, की मी अगोदर मेसमध्ये सभासदांना दोन भाज्या द्यायचो. आता एकच भाज देत आहे. यावरून एक अंदाज येतो की ही महागाई परवडणारी नाही.

हेही वाचा - कोरोना होऊन गेलाय आणि ठणठणीत बरं व्हायचंय तर मग 'असा' घ्या आहार

सध्या लॉकडाऊन होणार की नाही यावर अवती-भवती चर्चा ऐकायला मिळत आहेत. जर ती लागली तर जगणे मुश्‍किल होईल असे अनेक जण सांगताना दिसत आहेत. एका सामान्य माणसाच्या पगारात जेवढी वाढ होत नाही, त्या तुलनेत महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांनी कोणाकडे पाहावे? पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करा अशी जर मागणी केली तर भाजप किंवा केंद्र सरकार राज्यांकडे बोट दाखवते.

हेही वाचा - औरंगाबादेत कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात, खासगी रुग्णालयात २५० रुपये मोजावे लागणार

अशा स्थितीत कोणाकडे आशेने पाहायचे? महागाई वाढल्यावर सामान्य माणूस पैशा खर्चायला मागेपुढे पाहतो. त्याचा त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अगोदरच मर्यादित उत्पन्न साधने. त्यात महागाईचा भडका. सामान्य माणूस सहन करु शकत नाही. त्यासाठी सरकारने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. नाहीतर सध्या आपल्या देशात गोरगरिबांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे दिसत आहे. त्यांना देशभक्तीच्या नावाने किंवा सात वर्षांचा दाखल देऊन गप्प करण्याचा प्रयत्न होत आहेत. पण याने पोटपाण्याचा प्रश्‍न सुटणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inflation Rate High All Grocery Items Prices Hike Aurangabad News