INS Vikrant Case : 'उच्च न्यायालयात जाणार', नॉट रिचेबल सोमय्यांचा व्हिडिओ समोर

Kirit Somaiya Denied Allegations
Kirit Somaiya Denied Allegationssakal
Updated on

मुंबई : संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी (INS Vikrant Case) किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या पिता-पुत्रांनी ५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला असून दोघेही फरार असल्याचे राऊत म्हणाले. पण, आता एका व्हिडिओच्या माध्यमातून किरीट सोमय्या समोर आले असून आम्ही फक्त प्रतिकात्माक निधी संकलनाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामधून फक्त ११ हजार रुपये जमले होते, असं सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya Denied Allegations
किरीट सोमय्या फरार? मुंबई पोलिसांकडून शोध सुरू

२०१३ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने आयएनएस विक्रांतला सात कोटीत भंगारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही निषेध केला. भाजपने १० डिसेंबरला तासाभराचा प्रतिकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम केला. यामधून सुमारे ११ हजार रुपये जमले. त्यानंतर भाजपचे खासदार आणि आमदार १७ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखील राष्ट्रपतींना भेटलो. त्यांना ही सर्व माहिती दिली. राज्यपालांना सांगितलं. पण, आज १० वर्षानंतर संजय राऊत सांगतात, की किरीट सोमय्यांना ५८ कोटी रुपये ढापले. चार कंपन्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. यांच्याकडे एक कागद नाही, एक पुरावा नाही. पोलिसांकडे देखील कुठलाही पुरावा नाही. तक्रारदार म्हणतात संजय राऊतांच्या वक्तव्यांमुळे मी आलो आहे. या घोटाळेबाज सरकारचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या शांत बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत. न्यायालयापुढे ही सगळी माहिती सांगणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.

नेमकं प्रकरण काय? -

INS विक्रांत या युद्धनौकेने भारत-पाकिस्तान युद्धात मोठी कामगिरी बजावली होती. त्यानंतर या युद्धनौकेचा पुनर्विकास करण्यास सरकारने असमर्थता दर्शवली. पण, या युद्धनौकेचं जतन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. भाजपने आंदोलन करून मुंबईतील अनेक लोकांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम ५८ कोटी रुपयांच्या घरात होती. ही सर्व रक्कम राजभवनात जमा करण्यात येणार होती. पण, सोमय्यांनी ही रक्कम जमा केली नाही, असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com