किरीट सोमय्या फरार? मुंबई पोलिसांकडून शोध सुरू

Kirit-Somaiya
Kirit-Somaiyasakal
Updated on

भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. (INS Vikrant)

याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला असून मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी आज त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Kirit Somaiya Latest News)

Kirit-Somaiya
सुनावणीआधीच सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, चौघांची पोलिसात साक्ष

सध्या मुंबई पोलीस नील आणि किरीट सोमय्या यांच्या मागावर आहेत. न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने सोमय्यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र सोमय्या आऊट ऑफ कव्हरेज असल्याचं समजतंय. त्यांच्या क्रमांकावर फोन केल्यानंतर स्वीय्य सहाय्यकाच्या नंबरवर फोन डायव्हर्ट केल्याचं कळतंय. सध्या सोमय्यांना ट्रेस करू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र ते कुठे आहेत, याची कोणालाही माहिती नाही.

'राजभवनात सोमय्यांची माणसं फेऱ्या मारतायेत'

कालपासून सोमय्यांच्या माफिया टोळीची माणसं राजभवनात जाऊन कागदपत्रं तयार करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. राजभवनाने देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. नाहीतर त्यांची वाचलेली इज्जत देखील जाईल. किरीट सोमय्याची लवकरच काही प्रकरणे बाहेर पडतील. या गुन्ह्याची व्याप्ती ही राज्यव्यापी आणि देशव्यापी आहे, असंही राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतला वाचविण्यासाठी निधी गोळा केला होता. हा निधी राज्यपाल भवनाकडे पोहोचला नाही. याबाबत आम्ही राजभवानाकडून पत्र मागवलं होतं. त्यातून ही बाब समोर आली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com