सोलापूरची तहान अलमट्टीतून भागणार! उजनी अजूनही तळाशीच; जिल्हाधिकाऱ्यांकडून इंडी शाखा कालव्याची पाहणी

अलमट्टी धरणातून औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी आणण्याच्या दृष्टीने शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासह विजयपूर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेब्बाळ नाला व इंडी कॅनॉलची संयुक्त पाणी केली.
solapur collector
solapur collectorsakal

सोलापूर : अलमट्टी धरणातून औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी आणण्याच्या दृष्टीने आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासह विजयपूर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेब्बाळ नाला व इंडी ब्रॅंच कॅनॉलची संयुक्त पाणी केली. परंतु, त्या कॅनॉलमधून अपेक्षित पाणी आपल्याकडे आणणे कठीण असून दोन्ही बंधारे भरायला प्रत्येकी १०० दिवस लागतील, अशी तेथील स्थिती आहे.

सोलापूर व पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने उजनी अजूनही तळाशीच आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सोलापूर, पंढरपूर शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे लागले आहे. पण, पावसाळा संपत आला तरीदेखील धरणात समाधानकारक पाणी नसल्याने आगामी उन्हाळ्याच्या दृष्टीने तुर्तास सोलापूर शहराची तहान भागविण्यासाठी अलमट्टीतून औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत.

त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री. साळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव शासनाला पाठविल्यानंतर आज (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी हेब्बाळ नाला, इंडी शाखा कॅनॉल व अतिवाहकाची पाहणी केली. तत्पूर्वी, विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती.

हेब्बाळ नाल्यात महिन्यात १४ दिवसच सोडले जाते पाणी

इंडी शाखा कालव्यावरील हेब्बाळ नाला हा टेलला असून त्यात पाणी सोडल्यानंतर सगळे पाणी टेलला जाते. महिन्यातील १४ दिवस या कॅनॉलला पाणी सोडले जाते आणि त्यानंतर पुढील १० दिवस कॅनॉल बंद ठेवला जातो, अशी तेथील कार्यप्रणाली आहे. १२ किलोमीटर नाल्यातून १४ दिवसातील दोनच दिवस पाणी आपल्याकडे येईल. कर्नाटकचे धरणातून पाणी सोडण्याचे रोटेशन निश्चित असल्याने त्यात बदल करून आपल्याकडे सलग काही दिवस पाणी सोडणे अशक्य मानले जात आहे.

औज, चिंचपूर भरायला २०० दिवस लागतील

औज व चिंचपूर बंधारा सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. उजनीतून भीमा नदीत पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडल्यावर दहाव्या दिवशी औज बंधारा भरतो. त्यावेळी उजनीतून पाच हजार क्युसकने पाणी सोडावे लागते. अलमट्टीवरील इंडी शाखा कालव्याशी संलग्नित हेब्बाळ नाल्यात ५० क्युसेकचा विसर्ग सोडल्यावर औजमध्ये २५ क्यूसेक वेगानेच पाणी येईल. या वेगाने पाणी येत राहिल्यास औज बंधारा भरायला किमान १०० दिवस लागतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तरीदेखील उजनीतील पाण्यावर ताण पडू नये म्हणून अलमट्टीतून पाणी घेण्याचे प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com