esakal | राज्यात वाढतोय साक्षरतेचा टक्का; महाराष्ट्र देशात बाराव्या क्रमांकावर
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात वाढतोय साक्षरतेचा टक्का; महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर

राज्यात वाढतोय साक्षरतेचा टक्का; महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर

sakal_logo
By
प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : जगातील निरक्षरता दूर करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर साक्षरतादिन साजरा केला जातो. १९६६ मध्ये पहिल्यांदा हा दिवस युनेस्कोमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर आता जगभरातील सर्व देशात साजरा होत आहे. साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात बाराव्या क्रमांकावर आहे. राज्यात १९६१ मध्ये ३५.१ टक्के असलेलं साक्षरतेच प्रमाण २०११ ला ८२.३ टक्के आहे.

गत पन्नास वर्षांचा आलेख पहिला असता राज्यात साक्षरतेच्या टक्केत दरवर्षी वाढच होत असल्याचे दिसून येते. समुदाय साक्षरता, समाजाभिमुख साक्षरता, प्राथमिक शिक्षणापासून शिकण्याची गोडी, शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी होत असलेल्या सहीचा आग्रह, निरक्षरतेमुळे होणारे नुकसान, मागासवर्गीय मुलांना मोफत तथा सक्तीच्या शिक्षणसाठी केलेला कायदा, अशा एक ना अनेक कारणांमुळे साक्षरतेशिवाय आता तरणोपाय नसल्याने आणि शिक्षणावर होणारा शासनाचा खर्च यामुळे निरक्षरता होऊन संपात असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसून येते.

हेही वाचा: लसीकरणानंतरही ११ विद्यार्थ्यांना कोरोना; अचानक रुग्णवाढ

स्त्री शिकली की कुटुंब शिकेल, ही घोषणा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिली जाते. पुरुषांची शिक्षण किंवा साक्षरता त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी असते. पण, स्त्रीवर कुटुंबाच्या साक्षरता शिक्षणाची जबाबदारी धोरणात्मक पातळीवर टाकली जाते‌. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ असे असले तरी राज्यातील दरहजारी महिलांचे संख्येत घट होत असल्याचे दिसून येते. राज्यात १९६१ ला हजार पुरुषामागे ९३६ स्रिया होत्या तर २०११ मध्ये ते प्रमाण दर हजारी ९२९ स्रिया आहे. दरहजारी महिलांचे प्रमाण स्वातंत्र्यपूर्व काळापासून ९३६-९२९ दरम्यान आहे.

राज्यातील साक्षरतेचा वाढता टक्का (टक्केवारी)

  • वर्ष/लोकसंख्या (हजारांत)/पुरुष/ स्त्री/एकूण साक्षरता प्रमाण/ स्त्री - पुरुष प्रमाण

  • -१९९१/७८९३७/४०८२६/३८१११/६४.९ टक्के/९३४

  • -२००१/९६८७९/५०४०१/४६४७८/७६.९टक्के/९२३

  • -२०११/११२३७४/५८२४३/५४१३१/८२.३ टक्के /९२९

loading image
go to top