esakal | राज्यभरात इंधनाच्या दराचा भडका कायम; इंधन दरावाढीचा सामान्यांना धसका | Petrol
sakal

बोलून बातमी शोधा

petrol-diesel

राज्यभरात इंधनाच्या दराचा भडका कायम; इंधन दरावाढीचा सामान्यांना धसका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील (international market) इंधनाच्या कच्चा तेलाचे दर वाढल्याने (oil rates increases) आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल (petrol) २९ तर डिझेल (diesel) ३७ पैशाने महागले असून, औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे. त्यामुळे एकूणच राज्यभरात शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला असून, दरवाढ सातत्याने सुरू राहिल्यास इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईची (Inflation) शक्यताही अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही - सुप्रिया सुळे

मुंबईत शुक्रवारी पेट्रोल १०९.५४ तर डिझेल ९९.९२ रुपये प्रतिलिटर दरावर पोहोचले. यातुलनेत राज्यभरात विविध जिल्ह्यात इंधनाच्या दराचा उच्चांक पाहायला मिळाला. मुंबईसह मुंबई उपनगर, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर शंभरी नजीक पोहोचले आहेत. तर राज्यभरात पेट्रोलच्या दरानेही सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल ११० ते १११ रुपये प्रतिलिटरवर इतक्या उच्चांकीवर पोहोचले आहे.

इंधनाच्या दरासह सीएनजी, पीएनजीसह खाद्य तेल आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचेही दरवाढ झाली आहे.इंधनाची दरवाढ होत असल्याने त्याचा परिणाम सर्वसमान्यांवर होणार आहे. शेतमालासह, उत्पादित वस्तूंचे दर दुप्पट वाढतच आहे. सध्या ७ टक्क्याने महागाई वाढली असून, संघटित कामगारांना तर याच फटका बसत आहेच त्याशिवाय ९७ टक्के असंघटित वर्ग सुद्धा महागाईने धास्तावला आहे. घरातील दैनंदिन गरजा आणि घरभाडे, आरोग्य, शिक्षणासाठीही असंघटित कामगार करू शकत नाहीत. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती सध्या सर्वसामन्यांची झाली आहे. त्यामुळे महागाईचे दुष्टचक्र गरीबांना अधिक गरीब बनवत असून बाजारातील महागाईमुळे विषमता वाढवत असल्याचे अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

१० महानगरातील इंधनाचे दर

महानगर - पेट्रोल डिझेल
मुंबई - १०९.५४ - ९९.९२
चंदीगड - ९९.६७ - ९१.८५
बंगळुरू - १०७.१४ - ९७.७७
दिल्ली - १०३.५४ - ९२.१२
चेन्नई - १०१.१ - ९६.६०
कोलकाता - १०४.२३ - ९५.२३
पटना- १०६.५९ - ९८.६५
रायपूर - १०१.४४- ९९.५९
पणजी - १०१.३८ - ९७.३७
रांची - ९८.९ - ९७.२४

loading image
go to top