ISS Sighting: खगोलप्रेमींसाठी गुड न्यूज! पुणे, सातारा, कोल्हापूर अन् नाशिक पट्ट्यात 'या' तारखांना दिसणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

ISS Sighting International Space Station NASA Spot The Station: महाराष्ट्रातील काही भागात १ ते ४ डिसेंबरदरम्यान आकाशात दिसणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक; दुर्बिणीची गरज नाही. तुमच्या शहरातून ते नेमके कधी आणि कोणत्या दिशेला दिसेल, हे पाहण्यासाठी NASAच्या अ‍ॅपला भेट द्या.
ISS Sighting International Space Station

ISS Sighting International Space Station

esakal

Updated on: 

Pune: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील खगोल प्रेमींना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. तुम्ही जर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या पट्ट्यात वास्तव्याला असाल तर १ ते ४ डिसेंबरदरम्यान तुम्हाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे दर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, हे अंतराळ स्थानक पाहण्यासाठी दुर्बिणीचीही गरज भासणार नाही. आकाश निरभ्र असेल तर साध्या डोळ्यांनीही ते पाहता येणार आहे.

Loading content, please wait...