Meera Borwankar : मीरा बोरवणकरांचा अजित पवारांवर थेट आरोप; पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाल्या?

Meera Borwankar on Ajit Pawar: माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या बुधवारी प्रकाशित होणाऱ्या मॅडम कमिशनर या पुस्तकातील दाव्याने खळबळ उडाली होती.
IPS officer Meera Borwankar on Ajit Pawar in book madam commissioner allegation
IPS officer Meera Borwankar on Ajit Pawar in book madam commissioner allegation Esakal
Updated on

मुंबई- माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या बुधवारी प्रकाशित होणाऱ्या मॅडम कमिशनर या पुस्तकातील दाव्याने खळबळ उडाली होती.

मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी मला येरवाड्यातील जागा हस्तांतरित करण्यास सांगितली होती. पण, मी त्याला नकार दिला होता, असं त्या म्हणाल्या आहेत. (Meera Borwankar on Ajit Pawar)

IPS officer Meera Borwankar on Ajit Pawar in book madam commissioner allegation
NCP Crisis : अजित पवार गटाच्या त्या खेळीने वाढणार शरद पवारांचं टेन्शन? सुप्रीम कोर्टात...

येरवाड्यातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश अजित पवारांचा होता, असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे जागा द्या असं मला अजित पवारांनी सांगितलं.

याला मी नकार दिला. त्यामुळे येरवाड्याची जमीन वाचली. मला यात पडू नका असं सांगण्यात आलं होतं. बिल्डर, राजकारणी आणि पोलिसांची यात मिलीभगत होती, असा दावा मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

अजित पवारांचाच आदेश

मीरा बोरवणकर यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात खळबळजनक दावे केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. २०१० मध्ये येरवाड्यातील पोलिसांची जमीन बिल्डरला देण्याचा घाट घालण्यात आला होता.

त्यावेळचे पालकमंत्री (अजित पवार) यांनीच जमीन हस्तांतरण करण्यास सांगितलं होतं. माझा याला नकार होता. तेव्हा आर. आर. पाटील यांनी मला यात न पडण्यास सांगितलं होतं, असा दावा बोरवणकरांनी केला आहे.

IPS officer Meera Borwankar on Ajit Pawar in book madam commissioner allegation
न्यायासाठी जनतेच्या दबावाची गरज; मीरा बोरवणकर

पुस्तक न वाचताच आरोप

मला अनेक पोलिसांनी फोन करुन सांगितलं की, तुमच्यामुळे जमीन वाचली. लिलाव प्रक्रिया योग्य होती तर त्याआधीचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण का केली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

पुस्तक न वाचताच आरोप केले जात आहेत. माझ्या पुस्तकात एकूण ३८ प्रकरणं आहेत. पण, केवळ येरवाड्याच्या प्रकरणावरच चर्चा होत आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com