दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्चीची मालमत्ता जप्त

iqbal mirchi
iqbal mirchi

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्ची याच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याची ६०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

मुंबई आणि लोणावळा येथील फ्लॅट, कार्यालय आणि बंगल्याचा टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये समावेश आहे. बेकायदा संपत्ती जमविल्याप्रकरणी मिर्ची याच्यावर ईडीने आरोपपत्र दाखल केले. सुमारे १२०० पानी आरोपपत्रात त्याची पत्नी आणि दोन मुलांसह १२ जणांवर आरोप ठेवले आहेत. मुंबईतील १९९३ मधील बाँबस्फोटातील फरार आरोपी इक्‍बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडन येथे निधन झाले. मुंबईसह देशभरात त्याच्या मालकीच्या मालमत्ता असून, हवाला रॅकेटमार्फत शेकडो कोटींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com