कर्नाटकच्या ‘अलमट्टी’तून सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पाणी अशक्यच! आठमाही नियोजनामुळे फेब्रुवारीत नसते कॅनॉलला पाणी; वाचा इतरही कारणे

अलमट्टीतून औज बंधाऱ्यात पाणी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. टंचाईत तसा प्रयोग होणार आहे, पण फेब्रुवारीनंतर त्या कॅनॉलला पाणीच नसते. आठमाही नियोजनामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले जाते. त्यामुळे अलमट्टीतून पाणी आणण्याचा प्रयत्न दिवास्वप्नच ठरणार आहे.
Almatti Dam
Almatti Damsakal

सोलापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सोलापूरजवळील औज बंधाऱ्यात कॅनॉलद्वारे पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. टंचाई काळात तसा प्रयोग होणार आहे, पण फेब्रुवारीनंतर त्या कॅनॉलला पाणीच नसते. आठमाही नियोजनामुळे मार्च ते पावसाळा सुरु होईपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाते. त्यामुळे अलमट्टीतून पाणी आणण्याचा प्रयत्न यंदा दिवास्वप्नच ठरणार आहे.

अलमट्टी धरणातून पावसाळा सुरु झाल्यापासून फेब्रुवारीपर्यंत दरमहा कॅनॉलद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाते. पण, ज्या ठिकाणाहून औज बंधाऱ्यात पाणी आणले जाणार आहे, तो कॅनॉल टेलचा असल्याने त्याठिकाणी १५ दिवसांतून केवळ दोनच दिवस पाणी असते. त्यामुळे एका महिन्यातील चार दिवस आपल्याला पाणी औज बंधाऱ्यात आणता येईल. मात्र, त्या कॅनॉलला ५० क्युसेक विसर्ग सोडला जातो आणि औजकडे पाणी आणताना तो वेग २५ क्युसेकपर्यंतच राहील, अशी स्थिती आहे.

या वेगाने पाणी येत राहिल्यास औज बंधारा भरायला किमान सलग ७० ते १०० दिवसांचा कालावधी लागतो. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी हिळ्ळी बंधाऱ्याजवळ जावून पाहणी केली. त्यानुसार पाहणी अहवाल सरकारला पाठविण्यात आला आहे. मात्र, अलमट्टीवरील त्या कॅनॉलमधून औज बंधाऱ्यात समाधानकारक पाणी येईल, अशी स्थिती नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

उजनीचेही आठमाहीच नियोजन, तरीपण...

उजनी धरणाचे नियोजन देखील आठमाहीच असून त्या काळात शेतीला प्राधान्याने पाणी देणे अपेक्षित आहे. पण, उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई गृहीत धरून फेब्रुवारीनंतर पुढे पाऊस सुरु होईपर्यंत पिण्यासाठीच धरणातील पाणी राखून ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शेतीला एक-दोन आवर्तने फेब्रुवारी ते मे या काळात सोडली जातात. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याने उजनीवरील भार वाढल्याची वस्तुस्थिती आहे.

शेतीला दोन तर सोलापूरसाठी तीन आवर्तने

उन्हाळ्यात शेतीला टंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जानेवारी-फेब्रुवारीत एक तर एप्रिल-मे दरम्यान एक आवर्तन उजनी धरणातून सोडले जाते. दुसरीकडे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून तीन ते चारवेळा गरजेनुसार भीमा नदीतून पाणी सोडावे लागते. आता पाऊस पुन्हा गायब झाला असून सध्या धरण ६० टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे शेतीला दोन तर सोलापूरसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या दृष्टीने कालवा सल्लागार समितीत निर्णय अपेक्षित असून १५ ऑक्टोबरनंतर समितीची बैठक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com