राणेंना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावणं हा कायदेशीर गुन्हा - फडणवीस

"हा गुन्हा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर एफआयआर नोंदवा"
Narayan Rane
Narayan Ranesakal media

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस पाठवणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांविरोधात आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नारायण राणे यांना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावणं हा कायदेशीर गुन्हा असल्याचं सांगत हा गुन्हा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात एकामागून एक असे तीन ट्विट त्यांनी केले आहेत.

फडणवीस म्हणाले, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असं ठरवलेलं दिसतंय. राणेंना CRPC 160 ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरलेत की, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलवताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. त्यामुळं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणं हा कायदेशीर अपराध आहे. म्हणून आता ज्या अधिकाऱ्यानं हे केलंय त्याच्यावर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान, असं न केल्यास भाजपा CRPC 156 (3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसंच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानं करण्यात आलं असेल तर त्यांना सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनवण्यात यावं, अशीही आम्ही मागणी करु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com