

solapur city voting
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : महापालिकेसाठी मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी होती. सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांनी मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने रांगेत उभारलेल्या मतदारांना एका क्रमांकाची चिठ्ठी दिली होती. यावेळी प्रभाग १७ मधील मुर्गी नाल्याजवळील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय या केंद्रावर दोन महिला व एक पुरुष मतदानासाठी धावत आले. पण, साडेपाच वाजून पाच मिनिटे झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
सकाळच्या पहिल्या तासात सोलापूर शहरातील एक हजार ९१ मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. त्यापुढील दोन तासांत बरीच गर्दी दिसली. पण, त्यानंतर दुपारी साडेबारा ते चार या वेळेत मतदान केंद्रांवर मतदार येत नसल्याने उमेदवार चिंतेत होते. साडेचार ते साडेपाच या वेळेत ५०० हून अधिक मतदान केंद्रांवर मतदार नव्हते. दरम्यान, प्रभाग १७ मधील दोन महिला मतदार मतदान प्रतिनिधीकडून मतदानाची चिठ्ठी घेऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालय केंद्रावर आल्या होत्या. पण, त्यांच्याकडे ओळखपत्र कोणतेही नव्हते.
आधारकार्ड आणायला दोन्ही महिला घरी गेल्या आणि ५.३५ वाजता मतदान केंद्रावर आल्या. पण, मतदानाची वेळ साडेपाच असल्याने त्या महिलांना मतदान करता आले नाही. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना, पोलिसांना विनंती केली. तेथील मतदान प्रतिनिधी देखील त्या दोन महिलांसह एका पुरुष मतदारास मतदान करू द्या, असे सांगत होते. पण, मतदानाची वेळ संपल्याने सर्वांनीच नियमावर बोट ठेवत त्यांना परत पाठविल्याचे पाहायला मिळाले.
सायंकाळी बरोबर साडेपाच वाजता गेट बंद
मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होती. सायंकाळी ५.२५ वाजता पोलिस अंमलदार, होमगार्डनी आपल्या केंद्रावर कोणी मतदान करायला येत असेल तर त्याला लवकर येण्याचे आवाहन केले. बरोबर साडेपाच वाजता त्यांनी केंद्राचे गेट तर बंद केलेच पण १०० मीटर अंतरातून आत कोणालाच येऊ दिले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.