एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती १२ मार्च रोजी निवडले जाणार आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड १८ मार्च रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीच्या कार्यक्रमासाठी अध्यासी अधिकारी नेमले आहेत.
Solapur ZP

Solapur ZP

Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती १२ मार्च रोजी निवडले जाणार आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड १८ मार्च रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीच्या कार्यक्रमासाठी अध्यासी अधिकारी नेमले आहेत.

पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीसाठी करमाळ्याची जबाबदारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, माढ्यासाठी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, बार्शीसाठी उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले, उत्तर सोलापुरसाठी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, मोहोळसाठी उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, पंढरपूरसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, माळशिरससाठी विजया पांगारकर, सांगोल्यासाठी प्रांताधिकारी भैरप्पा माळी, मंगळवेढ्यासाठी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, दक्षिण सोलापूरसाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड आणि अक्कलकोसाठी प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे सोपविली आहे.

ग्रामविकास विभागाने २५ फेब्रुवारी दिलेल्या सूचनांनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील नियम ६७ व ६८ नुसार सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया हे अधिकारी पार पाडतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करताना प्रमुख अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहातात.

हात उंचावून सदस्य करतील मतदान

पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींच्या निवडीवेळी सर्व सदस्यांना उपस्थित राहावे लागते. सुरवातीला सभापती, उपसभापतींसाठी इच्छुकांकडून अर्ज घेतले जातात. त्यानंतर अर्ज माघारीसाठी काही वेळ दिला जातो. त्यानंतर एकच अर्ज राहिल्यास थेट निवड होते. एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्यासाठी सदस्यांचे मतदान घेतले जाते. बहुमताने सभापतींची निवड होते. सदस्यांनी हात उंचावून मतदान करायचे आहे. ज्या उमेदवाराच्या बाजूने सर्वाधिक मतदान, तो सदस्य सभापती होईल. त्यानंतर उपसभापतींसाठीही अशीच प्रक्रिया असणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी देखील अशीच प्रक्रिया असते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com