...तर हा कसला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव? उद्धव ठाकरेंचा केंद्राला सवाल

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

मुंबई : आज मुंबईत मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा ६२ वा वर्धापन दिन आज मुंबईत पार पडला आहे. या साप्ताहिकाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे असून मुंबईत शिवसेना नसती तर देशात हिंदुत्वाचं काय झालं असतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमावर सरकारला धारेवर धरलं आहे.

(Uddhav Thackeray On Central Government)

मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावेळी बोलताना उद्ध ठाकरे बोलताना म्हणाले की, "शिवसेना आणि मार्मिककडे कायम तरूणाईचं आकर्षण राहिलं आहे. मार्मिकने लोकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. वयानं थकलं तरी चालेल पण विचाराने थकलं नाही पाहिजे. आपण दीडशे वर्ष गुलामगिरीत काढली आणि त्यानंतर आपल्याला अनेक संघर्ष करून स्वातंत्र्य मिळालं. आपण आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, पण फक्त तिरंगा फडकावून देशभक्त होता येत नाही." असा टोला त्यांनी लावला आहे.

Uddhav Thackeray
Blackmoney परत आणून टॅक्स भरणाऱ्यांना बक्षीस; मोदींचा 'तो' Video Viral

सध्या केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव आहे. त्यांनी आता लोकशाहीला मृतावस्थेत नेत हुकुमशाही चालवली आहे पण शिवसेना संपणारा पक्ष नाही आहे. तुम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहात पण यावेळी तुम्ही लोकशाहीला मृतावस्थेत नेत असाल तर हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कसला? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर अनेकांना घरावर तिरंगा लावयाचा आहे पण त्यांच्याकडे घर नाही अशी अवस्था झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

व्यंगचित्रकारांच्या ताकदीबद्दल बोलताना "जर देश हुकुमशाहीकडे चालला असेल तर प्रत्येक व्यंगचित्रकाराने सरकारवर फटकारे मारलेच पाहिजेत." असा संदेश उद्धव ठाकरे यांनी व्यगचित्रकारांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com