शेतकरी सुकाणू समितीचे सोमवारी जेलभरो 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी सोमवारी (ता. 14) राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सुमारे दोन लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचे सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी, वीजबिल मुक्ती मिळावी, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका हमीभाव मिळण्याची स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. शेतकरीविरोधी आयात-निर्यात धोरण बदलणे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरात तालुका जिल्हा आणि पोलिस ठाण्यांबाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला कामगार संघटनांसह डाव्या पक्षांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 

सरकारने कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणी न करता उलट त्याआधारे शेतकऱ्यांकडूनच दीड लाखापुढील कर्ज वसूल करून स्वत:ची तिजोरी भरण्याचे काम केले आहे. सरकारने जाहीर केलेले 34 हजार कोटींची रक्कम कर्जमाफीसाठी खर्च केली आहे. सरकारने जाहीर केलेली 34 हजार कोटींची रक्कम कर्जमाफीसाठी खर्च केलेली नाही. कर्जमाफीस विलंब लावून नवीन कर्जेही बॅंकांनी मागील हंगामात न दिल्याने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: jail of Farmer Steering Committee on Monday