Shirsat Vs Chaturvedi: "...जर आम्ही चारित्र्य काढलं तर बात लंबी चलेगी"; शिरसाटांचं चतुर्वेदींना प्रत्युत्तर

गद्दारांना कुठलंही चारित्र्य नसतं अशा शब्दांत चतुर्वेदी यांनी शिरसाटांवर टीका केली होती.
Sanjay Shirsat Controversial Statement
Sanjay Shirsat Controversial Statement

मुंबई : शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी करणारे आमदार संजय शिरसाट यांना चतुर्वेदींनी चारित्र्यहीन असं संबोधिलं होतं. पण यानंतर शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. चारित्र्यहीन बोलू नका...जर आम्ही चारित्र्य काढलं तर 'बात लंबी चलेगी' असं ते म्हणाले आहेत. (Sanjay Sirsat and Priyanka Chaturvedi row emerged between prvious colleague in ShivSena)

Sanjay Shirsat Controversial Statement
Jaipur-Mumbai Exp Firing: प्रवाशांसोबत वाद नव्हता, 'या' कारणामुळं कॉन्स्टेबलनं झाडल्या गोळ्या; रेल्वे पोलीस आयुक्तांची माहिती

चारित्र्याहीन लोकांबद्दल मी बोलणार नाही, जे लोक गद्दार असतात त्यांना कुठलंही चारित्र्य नसतं, अशा शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिरसाट यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले, "चारित्र्यहीनतेच्या गप्पा प्रियंका चर्तुर्वेदींनी मारु नयेत. कृपया तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, जर आम्ही चारित्र्य काढायला बसलो ना तर बात लंबी चलेगी" (Latest Marathi News)

Sanjay Shirsat Controversial Statement
Jaipur-Mumbai Exp Firing: रेल्वेतील गोळीबारात मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची नुकसान भरपाई

मी आरोप केलेला नाही, तो आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. जेव्हा ते लोकसभेला पडले तेव्हा त्यांचं पुनर्वसन करायचं असं एकदा उद्धव ठाकरे म्हणाले होते. आम्ही स्वतः खैरेंना घेऊन उद्धव ठाकरेंकडं गेलो होतो. यांच्यासाठी काहीतरी करा, म्हटलं होतं. त्यावेळी यांचं पुनर्वसन केलं जाईल, असं आश्वासनं दिलं होतं. (Marathi Tajya Batmya)

Sanjay Shirsat Controversial Statement
Delhi Ordinance Bill: दिल्ली अध्यादेश विधेयक आजच राज्यसभेत येणार?, AAPनं काढला व्हिप!

त्यानंतर विधानपरिदेच्या आणि लोकसभेच्या जेव्हा जागा निघाल्या. त्यावेळेला आम्ही स्वतः खैरेंचं अभिनंदन केलं आणि त्यांना सांगितलं की आता खासदारकीला तुम्ही उमेदवार आहात. तसा सिग्नलही त्यांना देण्यात आला होता.

पण ऐनवेळेला आदित्य ठाकरेंनी काय कांडी फिरवली माहिती नाही. पण आमच्या जिल्ह्याला एमआयएमचा खासदार आहे तर एक आपला खासदार असला पाहिजे. यामुळं खैरे आता राज्यसभेचे सदस्य होणार हे जवळपास निश्चित झाल्यानं आम्हीही खुशीत होतो.

Sanjay Shirsat Controversial Statement
Jaipur-Mumbai Exp Firing: गोळीबार, चेन पुलिंग अन् अटक; एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

त्यावेळाला खैरेंनी चतुर्वेदींबाबत हे स्टेटमेंट केलं आहे. तुम्ही माझ्या तोंडी का मारता, मला कळत नाही. ही गोष्ट तुम्ही खैरेंना विचारू शकता. त्यांनी म्हटलं होतं की, सुंदरता पाहून यांना दिलेली राज्यसभेची खासदारकी आहे. त्यांनी म्हटलं तर ते माझ्या तोंडी मारायचं आणि मी अश्लील बोलतो मी चारित्र्यहिनासारखं बोललो. खैरेंना विचारा ते बोलले की नाही? त्यांच्या ऑडिओ क्लीप आहे त्यांच्याकडं, अशा शब्दांत शिरसाट यांनी चतुर्वेदींना प्रत्युत्तर दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com