esakal | 'पाणी बचाव'साठी मोदींचा खास मंत्र; राज्यातील ग्रापंचायतींशी साधला थेट संवाद I Narendra Modi
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

जलजीवन मिशन अंतर्गत देशातील पाच राज्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी मोदींनी संवाद साधला.

'पाणी बचाव'साठी मोदींचा खास मंत्र

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : महात्मा गांधी जयंतीचे (Mahatma Gandhi Jayanti) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जलजीवन मिशनमध्ये (Jal Jivan Mission) चांगले काम केलेल्या देशातील पाच राज्यातील पाच ग्रापंचायतींशी संवाद साधला. मोदींच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण बनवडी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना दाखवण्यात आले.

जलजीवन मिशन अंतर्गत देशातील पाच राज्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी संवाद साधला यांचे लाईव्ह प्रक्षेपण बनवडी ग्रामपंचायतीत (Banwadi Gram Panchayat) करण्यात आले. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अधिकारी सुनील शिंदे, किरण सायमोते, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, पाणी पुरवठा विभागाचे सुनील बसुगडे, सदानंद भोपळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

हेही वाचा: राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

Banwadi Gram Panchayat

Banwadi Gram Panchayat

दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, मणीपूर या राज्यातील सरपंचांशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जलजीवन मिशनच्या प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी या योजनेमुळे लोकांना झालेल्या फायद्यांची सरपंचांना विचारणा केली. त्याचबरोबर त्यांनी संबंधित गावात झालेल्या उपाययोजना, रोजगार निर्मिती याचीही माहिती सरपंचांकडून घेत पाणी किती महत्त्वाचे आहे, प्रत्येकांनी स्वच्छ पाणी पिले पाहिजे, कोरोना लसीकरण, स्वच्छ भारत मिशन आदी विषयी माहिती दिली.

हेही वाचा: अजित पवारांनी आमच्या आज्ञेचं पालन करावं : उदयनराजे

loading image
go to top