MPSC पास झाल्याचा खोटा गवगवा; आयोगाकडून कारवाई होणार

MPSC
MPSCe sakal

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली परीक्षा (MPSC Exam) पास झालो. आता अधिकारी पदी निवड झाली आहे, असे सांगत काही व्यक्ती अनेकांची फसवणूक करत आहेत. खोटी कागदपत्रे दाखवून काहीजण अधिकारी असल्याच्या थाटात बिनधास्तपणे सत्कारही स्विकारत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आयोगाने कठोर पाऊल उचलले आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असे आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) आयोजित परीक्षांमधून अधिकारी (Officer through MPSC) म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन त्याआधारे काही व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या बाबी आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती माहिती आयोगाने दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यातून आयोगाने ही माहिती शेअर केली आहे.

MPSC
MPSC : कागदपत्रे सादर करण्यासाठी वेब लिंक, शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधून अधिकारी पदी निवड झाली आहे. यासंसदर्भातील बनावट कागदपत्रे दाखवून एकाने अनेक संस्था आणि वर्तमानपत्रांना खोटी माहिती दिली. जालना जिल्ह्यातील एका दुकानदाराने राज्यकर निरीक्षक/राज्यकर उपायुक्त पदावर निवड झाल्याचे सांगत अनेकांची फसवणूक केली. विशेष म्हणजे या पठ्यानं अधिकारी पदावर निवड झाल्याचे सांगत अनेक ठिकाणी सत्कारमूर्ती म्हणून हजेरीही लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com