
अमरावतीच्या वझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य स्मृती बालगृहात वाढलेली माला पापळकर हिच्यामुळे अनाथ मुलांनाही प्रेरणा मिळत आहे.जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या मालाने आता महसूल सहायक' पदाला गवसणी घातली आहे. उद्या (सोमवारी) तिच्या नोकरीच्या पहिला दिवस असून तिला आशिर्वाद देण्यासाठी १२३ अनाथ दिव्यांगांसह पद्मश्री शंकरबाबा पापळकर उपस्थित राहणार आहेत.