esakal | समृद्धी महामार्ग: जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi mahamarg

समृद्धी महामार्ग: जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: नागपूर-मुंबई ७०१ किमी लांबीचा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) उभारणीचे काम सुरु आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड (jalna nanded express way) द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पहिल्या दिवसापासून संपूर्ण सहकार्य केल्याचे चव्हाण यांन सांगितले. या प्रकल्पाचा नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे.

समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड प्रकल्प असल्याने शहरापासून दूर प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. समृद्धी महामार्गावर एकूण १७०० संरचना (स्ट्रक्चर्स) उभारण्यात येणार आहेत. नाशिक आणि ठाणेदरम्यानच्या पॅकेजमध्ये सर्वात मोठ्या बोगद्याची निर्मिती केली जात आहे.

हेही वाचा: सिद्धार्थची आई खचून गेलेल्या शेहनाझची घेतेय काळजी

नवनगरांच्या कामाला प्राधान्य

समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी नवनगरांची उभारणी केली जाईल. त्यापैकी वर्धा, वाशीम, बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन आणि ठाणे जिह्यातील एक अशा ९ नवनगरांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे श्री. मोपलवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रत्येक नवनगरात साधारणतः एक लाख लोकसंख्या असेल आणि सर्व सोयीसुविधा नवनगरांत उपलब्ध असतील. पुढील तीन वर्षांत या ठिकाणी उद्योग-व्यवसाय स्थापन होतील, असा विश्वास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: मुंबई-सिंधुदुर्ग फक्त तीन तासांत?, 70 हजार कोटींचा 'कोकण एक्स्प्रेस-वे'

सौरऊर्जेची निर्मिती आणि धावपट्टी

समृद्धी महामार्गालगत नैसर्गिक वायूची पाइपलाइन, सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबरचे जाळे आदींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी संरचना नाहीत आणि सलग पाच किमीचा सरळ पट्टा आहे अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरविण्यासाठी धावपट्ट्या उभारण्याचाही मानस असून त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

loading image
go to top