सिद्धार्थची आई खचून गेलेल्या शेहनाझची घेतेय काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थची आई खचून गेलेल्या शेहनाझची घेतेय काळजी

सिद्धार्थची आई खचून गेलेल्या शेहनाझची घेतेय काळजी

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अकाली निधनाचा अनेकांना धक्का बसला आहे. सिद्धार्थ अचानक जग सोडून गेल्याचे सर्वात जास्त दु:ख त्याचे कुटुंबीय आणि जवळची मैत्री शेहनाझ गिलला (Shehnaaz Gill) झाले आहे. सिद्धार्थच्या अंत्यविधीच्यावेळी शेहनाझ कोलमडून गेल्याचे दृश्य कॅमेऱ्यांनी टिपले. स्मशानभूमीत शेहनाझ ज्या पद्धतीने सिद्धार्थच्या नावाचा पुकार करत होती, ते दृश्यपाहून मित्रपरिवार आणि चाहते हेलावून गेले.

काही बातम्यांनुसार दोन सप्टेंबरला सिद्धार्थला सर्वप्रथम ज्यांनी बेशुद्धवस्थेत पाहिले, शेहनाझ त्यापैकी एक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थला सकाळी १०.३० च्या सुमारास कुपर रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी कुटुंबीयांसोबत शेहनाझ सुद्धा तिथे होती. याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासल्यानंतर सिद्धार्थला मृत घोषित केले.

हेही वाचा: पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE

शेहनाझचे वडिल संतोक सिंह सुख म्हणाले की, "शेहनाझची रडून रडून खूप वाईट अवस्था आहे. तिने मला सांगितलं, पप्पा माझ्य हातामध्ये त्याने प्राण सोडले. माझ्या हातामध्ये असताना त्याने जगाला अलविदा केलं. आता मी काय करणार? कशी जगणार?" टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची आई शेहनाझच्या मागे खंबीरपणे उभी राहिल्याचं काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: कोरोना महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल - मनसे

सिद्धार्थची आई सध्या वाईट अवस्थेत असलेल्या शेहनाझची काळजी घेत असल्याचे काही माध्यमांनी म्हटलं आहे. सध्या शेहनाझ व्यवस्थित झोपत नाहीय. खातपित नाहीय. कोणाशी जास्त बोलत नाहीय. या स्थितीत तिला एकटीला सोडता येणार नाही. सिद्धार्थची आई या कठीण काळात तिच्यासोबत आहे. तिची सगळी काळजी घेत असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

Web Title: Late Actor Sidharth Shuklas Mother Taking Care Of Shehnaaz Gill

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..