"जलयुक्त शिवार ठेकेदारीमुक्त करा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पंढरपूर - राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून लाखो लिटर क्षमतेचे पाणीसाठे निर्माण झाले आहेत. जलयुक्त शिवार योजना आणखी गतिमान करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. सरकारने ही योजना ठेकेदारीमुक्त केली तर या योजनेत अधिक लोक स्वतः सहभागी होतील, असे मत राष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. 

पंढरपूर व सांगोला तालुक्‍यातील कासाळगंगा ओढ्याच्या पुनरुज्जीवन प्रकल्प पाहणीसाठी ते आज येथे आले होते. पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी जलसाक्षरता या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ""लोकसहभाग आणि सरकार यांच्या माध्यमातून नद्या, ओढे आणि नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरू आहे. नद्या आणि ओढ्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कामामुळे दुष्काळी भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. चंद्रभागा ही एक प्रमुख नदी आहे. राज्य सरकारने "नमामि चंद्रभागे'च्या माध्यमातून नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सरकारने या योजनेची घोषणा केली असली तरी अद्याप या कामाला सुरवात झाली नसल्याची खंतही या वेळी त्यांनी बोलून दाखवली.

Web Title: jalyukat shivar contractor free