Jan Ashirwad Yatra: मुंडे साहेबांच्या आशिर्वादने मी राजकारणात- मंत्री कराड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Jan Ashirwad Yatra

केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेले मंत्री आज राज्यातून जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात करत आहेत

मुंडे साहेबांच्या आशिर्वादने मी राजकारणात- मंत्री कराड

बीड: Jan Ashirwad Yatra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब, शेतकरी यांच्यासाठी अनेक कल्यानकारी योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून पोहचविणार आहोत. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशिर्वादने मी राजकारणात आलो आहे, अशी प्रतिक्रिया अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी वैद्यनाथचे दर्शन घेतल्यानंतर दिली. आज बीडमधील परळीतून भाजपची जनआशिर्वाद यात्रा निघणार असून त्याला पंकजा मुंडे हिरवा कंदिल दाखवणार आहेत. ( Jan Ashirwad Yatra parali beed bhagwat karad)

पुढे बोलताना मंत्री कराड म्हणाले, ज्यांनी मला राजकारणात आणले, त्यांना अभिवादन करून यात्रेची सुरुवात करत आहोत. याप्रसंगी वैद्यनाथ ट्रस्टच्या वतीने सत्कार श्री. कराड यांचा सत्कारही करण्यात आला. परळीतून सुरू होणाऱ्या या जनआशिर्वाद यात्रेला मंत्री कराड यांच्या पत्नी आणि मुलगाही सोबत आहे. जनआशिर्वाद यात्रा ही देशातील १४२ मतदारसंघातून जाणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली.

केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेले मंत्री आज राज्यातून जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात करत आहेत. मराठवाड्यातील यात्रा गोपीनाथ गडावरून सुरू होणारा आहे. या यात्रेला पंकजा मुंडे हिरवा कंदिल दाखवणार आहेत.