esakal | दिल्ली पोलिसांनी न सांगता कारवाई कशी केली? ATS प्रमुखांनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली पोलिसांनी न सांगता कारवाई कशी केली? ATS प्रमुखांनी दिलं उत्तर

जान मोहम्मद हा मुंबईतील धारावीचा असून त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याची माहिती एटीएस प्रमुखांनीन दिली.

दिल्ली पोलिसांनी न सांगता कारवाई कशी केली? ATS प्रमुखांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्ली पोलिसांनी देशभरात सहा दहशतवाद्यांना अटक करून घातपाताचा कट उधळला आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्याला न सांगताच अटक केली आहे. याबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती असे एटीएस प्रमुखांनी स्पष्ट केलं. जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे अटक केली आहे. त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. महाराष्ट्राबाहेर राजस्थानमध्ये त्याला अटक झाली असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.

मुंबईत त्याने रेल्वेचं तिकिट बूक केलं होतं आणि मुंबईतून दिल्लीला जाताना राजस्थानातील कोटा इथं त्याला अटक केली जाते. यात एटीएसचं अपयश कसं असा सवालही विनित अग्रवाल यांनी विचारला. जान मोहम्मद हा मुंबईतील धारावीचा असून त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याची माहिती एटीएस प्रमुखांनीन दिली. ते म्हणाले,'गोळीबार आणि तोडफोडीचा गुन्हा २० वर्षांपुर्वीचा आहे. त्याची इतर माहिती आमच्याकडे आहे. जान एटीएसच्या रडारवर होता.'

जान मोहम्मद घातपाताची तयारी करत होता तरी एटीएसला माहिती नव्हती यावरून राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी एटीएसवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याबद्दल विचारले असता विनित अग्रवाल म्हणाले की, या प्रकरणाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जान मोहम्मदला अटक केली तेव्हा त्याच्याकडे कोणतेही स्फोटकं किंवा शस्त्र सापडलेलं नाही. एफआयआरची कॉपी मिळाल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल अशीही माहिती एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिली.

हेही वाचा: राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा

जान मोहम्मद हा मुंबईतील धारावीचा असून त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याची माहिती एटीएस प्रमुखांनीन दिली. ते म्हणाले, गोळीबार आणि तोडफोडीचा गुन्हा २० वर्षांपुर्वीचा आहे. त्याची इतर माहिती आमच्याकडे आहे. जान एटीएसच्या रडारवर होता. आमच्या रडारवर १ हजार जण आहेत. जान मोहम्मदवरची केस ही २० वर्षांपूर्वीची होती आणि त्याचा सध्याच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मुंबईत रेकी केलेली नाही. ते रेकी करणार होते अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. त्यांच्याशी काल आणि आज बोलणं झालं असल्याचंही विनित अग्रवाल म्हणाले.

दिल्ली पोलिस जे करु शकले नाही ते आम्ही करणार असे काही नाही. आम्ही एकत्र मिळून काम करू. आम्हाला जी माहिती आहे ती त्यांना देऊ आणि त्यांना असलेली माहिती घेऊ. आमच्याकडे आता त्याच्याबाबत जी माहिती आहे ती त्यांनाच देऊ, माध्यमांना नाही असे विनित अग्रवाल यांनी सांगितलं.

हेही वाचा: दिल्ली पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई; राज्याच्या गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात त्यांचे धागेदोरे नाहीत. त्यांचे दिल्लीशी कनेक्शन आहे आणि दिल्लीला जाऊन पुन्हा ते इथं पोहोचण्याआधीच संबंधितांना अटक केली आहे. गणेशोत्सवानिमित्त काही धोका आहे की नाही याबाबत दिल्ली पोलिसच सांगतील. केंद्रीय संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर एकाच वेळी सर्वांना अटक केली. वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक महाराष्ट्रातील आहे असे विनित अग्रवाल म्हणाले.

loading image
go to top