
Ladki Bahin Yojana January Allowance: राज्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यांमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आहे, आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील काही दिवसांत मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, मात्र काही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारने लाभार्थ्यांची छानणी पूर्णपणे सुरु केली नसली तरी तक्रार आल्यास ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना हप्ता मिळणार नाही सांगितले जात आहे. याआधीही छगन भुजबळ यांनी अपात्र महिलांनी स्वत: हून आपली नावे काढून घ्यावीत असे सांगितले होते.