
Jarandeshwar Case : 'गुरु कॉमोडिटी'प्रकरणी अजित पवारांना दिलासा; किरीट सोमय्यांनी दिली होती तक्रार
मुंबईः मागच्या वर्षी गाजलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
गुरु कॉमोडिटीच्या माध्यमातून जरंडेश्वर कारखाना आणि मालमत्तेची खरेदी करण्यात आलेली होती. ६५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली होती. गुरु कॉमोडिटी ही अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता.
हेही वाचा: Abdul Sattar : 'औरंगाबाद' नामांतराच्या मुद्द्यावरुन अब्दुल सत्तारांचं मोठं विधान; म्हणाले...
जरंडेश्वर कारखान्यासह जमीन, इमारती आणि इतर मालमत्तेवरील प्रतिकात्मक जप्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयकर विभागाने हटवली आहे. सातारा जिल्ह्यातील चिमणगाव गोटा (ता. कोरेगाव) येथे ही मालमत्ता आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार दिली होती.
हेही वाचा: Uddhav Thackeray : बैठकीला गेले आणि 'हो ला हो' करुन आले; सीमावादावर ठाकरे म्हणाले...
दरम्यान, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Mills) मूळ संचालकांना परत द्यावा, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी ईडीकडे केली होती. आपण कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांमार्फत ही मागणी करत आहोत असेही त्यांनी सांगितलेले.
ईडीने हा कारखाना अंतिमतः जप्त करून त्याचा ताबा घेतल्यावर तो आम्हाला चालविण्यासाठी द्यावा, अशी मागणी संचालकांनी केलेली. मात्र आज कोर्टाने अजित पवार यांना दिलासा दिलासा दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.