देशाचे पहिले पंतप्रधानमंत्री नेहरूजींच्या जयंतिनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम 

red.jpg
red.jpg

दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 130 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले.

दरम्यान, मोदीजी यांनी आज सकाळी व्टिट करत त्यांना अभिवादन केले. देशाच्या विविध भागात जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांनी शांतिवन येथे जाऊन अभिवादन केले. पंतप्रधान मोदीजी यांच्यानंतर काॅंग्रेसने देखील  त्यांच्या आॅफिशियल व्टिटर अकाउंटवरून  त्यांना अभिवादन केले.

देशाचे पहिले पंतप्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. नेहरूजी यांचा जन्म 14 नोंव्हेबर 1889 ला झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा अंत्यत महत्वाचा वाटा होता. 1964 ला त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

छोट्या मुलांप्रती त्यांना खुप जिव्हाळा होती. लहान मुलांना देखील त्यांचा खुप आदरभाव वाटत असे. संयुक्त राष्ट्रसंघ यांच्यातर्फे 20 नोव्हेंबरला बालदिवस साजरा केला जात होता.  जवाहरलाल नोहरू 15 आॅगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत पंतप्रधान होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com