सुधीरभाऊ राज्य दारूमुक्त कराच - जयंत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - "सुधीरभाऊ तुम्ही प्रामाणिक आहात. दारूबंदीच्या विरोधात तुमची भूमिका योग्यच आहे. पण चंद्रपुरात दारूबंदीचा निर्णय घेतला, मग महाराष्ट्रातही दारूबंदी करून दाखवा. चंद्रपुरात दारूबंदी अन्‌ बाकी महाराष्ट्राने दारू प्यावी, असा भेदभाव तुम्ही अर्थमंत्री म्हणून करू नका. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत आवाहन केले. 

जीएसटी विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी जोरदार मुद्दे मांडत भाजप सरकारच्या निर्णयाची अक्षरश: चिरफाड केली. जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नावर प्रचंड मर्यादा येणार असून, केवळ पेट्रोल, डिझेल व मद्यावरील करामधूनच राज्याचे उत्पन्न वाढण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री सभागृहात नसल्याची संधी साधत जयंत पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना राजकारणात "संधी' शोधावी लागते. आता तातडीने दारूबंदीचा निर्णय घ्या अन्‌ मुख्यमंत्री होण्याची संधी घ्या, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

कटप्पानं बाहुबलीला का मारले? 

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, यावर देशभरात चर्चा रंगलेली असली, तरी आम्ही मात्र याचं उत्तर शोधायला माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी गेलो, या जयंत पाटील यांच्या शाब्दिक षटकाराने आज विधानसभेत हस्याचा स्फोट झाला. 
"जीएसटी'वर तब्बल सव्वातीन तास जयंत पाटील यांनी प्रचंड टोलेबाजी करताना अखेरच्या क्षणी खडसे व फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षाला बाहुबली व कटप्पाचा संदर्भ देत स्पर्श केला. खडसे यांच्या घरी जाऊन आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगताना मुत्सद्दीपणे जयंत पाटील म्हणाले, ""खडसेंनी आमचा चांगला पाहुणचार केला. माणूस सत्तेतून बाहेर असल्यावर किती सुखी असतो हे खडसे यांच्याकडे पाहून कळाले.'' या वाक्‍यावर सर्वच पक्षाच्या सदस्यांनी जोरादार दाद दिली. 

मात्र जयंत पाटील यांच्या या कटप्पा व बाहुबलीच्या संदर्भाने खडसे हे मंत्रिमंडळातले बाहुबली नेते होते. मात्र मुख्यमंत्री हे रणनीतिकारांचे कटप्पा असल्याची चर्चा विधान भवन परिसरात खुमासदारपणे सुरू होती. 

Web Title: Jayant Patil appealed Sudhirbhau state liquor free