सत्ता गेलेल्यांचा तोल जाऊन 'ते' भ्रमिष्ठ होतात : जयंत पाटील

Jayant Patil
Jayant Patilesakal

सांगली : सोन्याचा मुकुट द्यायचाच नसल्याने चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)जोषात केलेली ऑफर फसवी आहे. सत्ता गेली की लोक भ्रमिष्ठ होतात किंवा त्यांचा तोल जातो. आता भाजपच्या अनेक नेत्यांचे नेमके काय झाले आहे हा संशोधनाचा विषय आहे अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेचे प्रहार केले होते. पोलिस मुख्यालयाच्या भुमीपुजनाच्या निमित्ताने ते जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी ते बोलत होते.

दोन दिवसापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळत त्यांना असा काही जोराचा शॉक द्या की त्याबद्दल सोन्याचा मुकुट घालून सत्कार करु असे नवे लक्ष्य दिले होते. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करीत टिका केली होती. जयंतरावांनी चंद्रकांतदादांच्या या ऑफरवर व टिकेवर मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले,‘‘ दादांना हे नक्की माहित आहे की सोन्याचा मुकुट कोणालाच द्यायची वेळ येणार नाही. त्यामुळे ते जोरात घोषणा करीत आहेत. वेळ आली की त्यांना ते कळेलच. विरोधकांचा एकेरी उल्लेख करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र सत्ता गेली की लोक भ्रमिष्ट तरी होतात किंवा त्यांचा तोल तरी जातो. दादांबाबत नेमके काय झाले याचे संशोधन व्हायला हवे. ते ज्यांना नेते मानतात त्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले आहे. मोदींच्याबाबतीतही असा एकेरीपणा खासगीत उल्लेख करीत असावेत.’’

लस गरीबांच्या खिशातले पैसे काढूनच

पेट्रोल-गॅसची दरवाढ लस फुकट दिल्यानेच करावी लागल्याचे भाजपचे नेते सांगत आहे यावर टिका करताना जयंत पाटील म्हणाले, यांनी लस जनतेच्या खिशातून पैसे काढून दिली. तीच लस फुकट दिल्याची जाहिरात मात्र भाजप मोदींचे फोटो लावून केली जात आहेत. शेतकरी, वाहनधारक, गरीब गृहिणीच्या यांचे पैसे इंधनदरवाढीतून काढून घेतल्याचेच ते मान्य करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com