जय किसान! लोकशाहीसमोर हुकुमशाही झुकली - जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले.

जय किसान! लोकशाहीसमोर हुकुमशाही झुकली - जयंत पाटील

जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर मोदी सरकारने ३ काळे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्र सरकारने करू नये. देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता, असा घणाघात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा: PHOTO - कृषी कायदे लागू ते मागे घेण्यापर्यंत महत्त्वाचे 10 मुद्दे

ते म्हणतात, देशाच्या पंतप्रधानांनी आज हे तीनही काळे कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मी भारतातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो! देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता. परंतु लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्रामाणिपणे लढा दिला, त्यामुळेच आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होता असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून भाजपा आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली! असं ट्विट करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: सरकारनं समजूतदारपणा दाखवला - राजू शेट्टी

loading image
go to top