जयंत पाटील यांचे विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर ‘शालजोडे’..! 

जयंत पाटील यांचे विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर ‘शालजोडे’..! 

मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत भाजप, शिवसेना आमदारांना शाब्दिक चिमटे काढले. शिवसेनेतील निष्ठावानांना संधी कधी मिळणार आहे. सुनील प्रभू विधानसभेत एवढं बोलतात पण त्यांना पक्षाने मंत्री केलं नाही. कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून आमदार दिले, तिथला अर्धा मंत्री तरी करायला हवा होता, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील शाब्दिक चिमटे :

- मंत्री कोण झाले तर दोन वर्षांपूर्वी विधानपरिषदेत निवडून आलेले तानाजी सावंत
- शिवसेना आमदारांच्या चेहऱ्यावर संताप आणि नाराजी आहे
- कुठल्याच आमदाराला माहित नाही सावंत मंत्री झाले कसे
- शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी आता संशोधन सुरू केलं आहे
- दोन वर्षात तानाजी सावंत यांनी मातोश्रीसाठी असं काय केलं की निष्ठावान आमदारांना डावून त्यांना मंत्री केलं
- त्यांनी असा कोणता गड जिंकून दिलाय
- जयदत्त क्षीरसागर आमच्याकडे होते तेव्हा शिवसेनेवर बोलायचे
- त्यांना शिवसेनेत जायचं होतं म्हणून ते शिवसेनेवर बोलत होते हे आता लक्षात आलं

विखेंना टोला

- विरोधात असताना विखेंनी केलेल्या भाषणांचा मुख्यमंत्र्यांनी आदर्श घ्यावा
- विखेंबाबत मी मागचं काहीच काढणार नाही, आज सकाळचेच सांगतो
- विजय वड्डेटीवर मला सकाळी विचारत होते की मी विरोधी पक्षनेता  कधी  होणार
- मी वडेट्टीवारांना सांगितले तुम्ही जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सूचना ऐकत नाही, सल्ला घेत नाही तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षनेते होत नाही

- मुुख्यमंत्र्यांनी चार आदिवासी आणि मागासवर्गीय मंत्र्यांना काढलं
- मात्र घेताना केवळ दोन घेतले
- मार्च महिन्यात प्रकाश मेहतांबाबतचा लोकायुक्तांचा अहवाल मुुख्यमंत्र्यांकडे आला होता
- तरीही साडेचार महिने त्यांना मंत्रीपदावर ठेवलं

राम कदमांना टोला

- भाजपामध्ये अनेक निष्ठावान आहेत
- चैनसुख संचेती, सरदार तारासिंह, राजेंद्र पटणी आहेत
- मंगलप्रभात लोढांनी काय कमी केलंय की त्यांना तुम्ही मंत्री केलं नाही
- सगळ्यांचं जाऊ द्या राम कदमांना मंत्रीी करायचं होतं, त्यांनी कुणालाही उचलून आणलं असतं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com