
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन सोहळा पुण्यातील बालगंधर्व मंदिरात पार पडत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषण करताना भावूक झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्याकडे मोठी मागणी केली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, साहेबांनी सात वर्ष काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार पण मला या पदातून मुक्त करा. अनेक तरुण आहेत त्यांना संधी दिली पाहिजे. याबाबात पक्षप्रमुख शरद पवार यांनी निर्णय घ्यावा असे पाटील म्हणाले.