Jayant Patil NCP
Jayant Patil NCPEsakal

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच रंगली जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

NCP Foundation Day: दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कोणाला नको आहेत, का अशी चर्चा त्यांनी आज केलेल्या विधानामुळे पुन्हा सुरू झाली आहे.
Published on

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आज नगरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत मोठो खुलासा केला.

जयंत पाटील हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वीही अनेक नेत्यांना जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर नको होते. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कोणाला नको आहेत, का अशी चर्चा त्यांनी आज केलेल्या विधानामुळे पुन्हा सुरू झाली आहे.

Jayant Patil NCP
Murlidhar Mohol: मोहोळांकडील खाते विधानसभेसाठी ठरणार गेमचेंजर! महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला कोणती खाती?

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले, "माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष असून, माझे महिने अनेकांनी मोजून झाले आहेत. पण आता इथून पुढे माझे चार महिने मोजू नका, मी सगळे व्यवस्थित करतो. आणि ट्विटरवर जाहीरपणे बोलायचे जरा बंद करा. जर जयंत पाटलांची काही तक्रार असेल तर ती पवार साहेबांकडे करा. ते जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. पण जाहीर बोलू नका. हा पक्ष एकाची संपत्ती नसून, महाराष्ट्रातील लाखो लोकांंची संपत्ती आहे, असे म्हणत पक्षाबाद्दल जाहीरपणे बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी इशारा दिला."

Jayant Patil NCP
Chhagan Bhujbal: जागावाटप घालणार महायुतीत घोळ? जेवढ्या जागा शिंदेंना तेवढ्याच आम्हालाही हव्या; भुजबळ आक्रमक

या कार्यक्रमात पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना बारामतीतच अडकवून ठेवायचे असा विरोधकांचा डाव होता. सुप्रिया सुळे यांचा बारामतीमध्ये पराभव करण्यासाठी त्यांनी शक्य असलेली प्रत्येक गोष्ट केली. पण निवडणुकीत राज्यात फिरणार नाहीत, ते पवार कसले. निकालानंतर या निवडणुकीत राज्यात शरद पवारांची लाट होती हे दिसले. आणि त्यामुळेच 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com