Murlidhar Mohol: मोहोळांकडील खाते विधानसभेसाठी ठरणार गेमचेंजर! महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला कोणती खाती?

Ministry of Co-operation: खातेवाटपात मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते मिळाले आहे. मोहोळ यांना मिळालेले हे सहकार खाते महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकीत भाजपसाठी गेमचेंजर ठरू शकते.
Murlidhar Mohol Minister of state for cooperation
Murlidhar Mohol Minister of state for cooperation Esakal

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून काल शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. त्यांच्यासोबत कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून 71 जणांनी शपथ घेतली आहे. नव्या मंत्रिमंडळात जुन्या अनुभवी नेत्यांसोबतच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश केला आहे. यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे राज्यमंत्री म्हणून नाव सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेले.

आज झालेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपात मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते मिळाले आहे. मोहोळ यांना मिळालेले हे सहकार खाते महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकीत भाजपसाठी गेमचेंजर ठरू शकते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा षटकार

महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने सहकार चळवळीसाठी ओळखले जाते. राज्यात विविध कार्यकारी सोसायट्या, दुग्ध व्यवसाय, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था आणि सर्वात महत्त्वाचे साखर कारखानांच्या माध्यमांतून काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीने ग्रमीण भागांवर आपली पकड निर्माण केली आहे.

काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या राजकीय यशात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत केंद्रात सहकार मंत्रालय अस्तित्वात नव्हेत. पण मोदी सरकारच्या गेल्या कार्यकालात त्याची निर्मिती कण्यात आली. आणि आता सहकाराचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील खासदार मुरलीधर मोहळ यांना सहकार खात्याचे राज्यमंत्री करत भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी षटकार ठोकला आहे.

Murlidhar Mohol Minister of state for cooperation
PM Modi Cabinet Expansion: मोदी 3.0 मध्ये कोणाच्या वाट्याला कोणती मंत्रालये! पाहा यादी

विधानसभा निवडणुकीत मोहोळ यांचा सहकार खाते ठरणार गेमचेंजर?

राज्यातील सर्व प्रमुख सहकारी साखर कारखाने काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रावदी काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात आहेत. याच्याच जोरावर या नेत्यांनी आपली राजकीय कारकिर्द उभी केली आहे. दरम्यानच्या काळात अनेक साखर कारखाने डबघाईला आल्याचे आपण पाहिले आहे. काही कारखाने कर्जबाजारी झाले आहेत. तर काही कारखाने बुडाले आहेत.

अशा परिस्थितीत गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीतील कारखानदारी करणाऱ्या अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपआपल्या कारखान्यांना मतद मिळवत कारखाने वाचवले आहे.

अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्रीपद मिळाल्याने अनेक कारखानदार अडचणीत असलेले कारखाने वाचवण्यासाठी भाजप प्रवेश करू शकतात. त्यामुळे आपोआपच विधानसभेसाठी भाजपला याचा फायदा होऊ शकतो हे नक्की.

Murlidhar Mohol Minister of state for cooperation
Murlidhar Mohol Portfolio: मुळशीचा पैलवान शहांच्या मंत्रालयाचा उपकर्णधार! मुरलीधर मोहोळांच्या खात्याचा पुण्याला फायदा काय? जाणून घ्या

महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याला मिळाले कोणते खाते?

कॅबिनेट मंत्री

नीतीन गडकरी- रस्ते वाहतूक मंत्रालय

पीयुष गोयल- उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

प्रताप जाधव- आयुष, आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालय

राज्यमंत्री

रामदार आठवले- सामाजिक न्याय मंत्रालय

रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय

मुरलीधर मोहोळ- सहकार आणि नागरी उड्डाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com