
जयंत पाटलांच्या आवाहनाला स्वाभिमानीकडून प्रत्युत्तर; जाधव म्हणाले...
सांगली: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले, याची यादी जाहीर करावी आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) खोटे बोलत असतील, तर ते उघड करावे, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते भागवत जाधव (Bhagwat Jadhav) यांनी दिले आहे.
हेही वाचा: 'भोंगा' चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण होताच किशोरी पेडणेकर म्हणाल्या...
पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडू नये, तुमची सगळी कामे केली आहेत, असे आवाहन केले होते. त्याला स्वाभिमानीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जाधव म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवले, याची यादी जाहीर करावी.
हेही वाचा: पवारांनी आपली टुकडे-टुकडे गँग आवरावी - चंद्रकांत पाटील
जयंत पाटील यांनी जनतेसमोर राजू शेट्टी यांनी कोणती कामे सांगितली होती आणि ती कधी पूर्ण केली, याची यादी द्यावी. राजू शेट्टी यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे उघड केले. खासगीकरणामुळे शेतकऱ्यांला सहा पैसे युनिटची वीज सहा रुपयाने मिळणार असल्याचे स्पष्ट केले. पूरग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून १४० किलोमीटर पायी यात्रा काढली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या एवढी ९६० रुपये प्रतिगुंठा मदत देऊ, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात १३५ रुपये दिले गेले. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप या महाविकास घाडीच्या सरकाराने केले. अशा सरकारसोबत आम्ही का राहायचे असेही ते म्हणाले.
Web Title: Jayant Patil Raju Shetti Appeal Responds To Swabhimani Sangli Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..