उडताय रावसाहेब, पळतोय गिरीश, इलेक्शन आलया... ! विरोधकांचं 'झिंगाट' गाणं

jayant_patil
jayant_patil

मुंबई : अर्थसंकल्पीय भाषणावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज सरकारच्या घोषणा व योजनांची पोलखोल करत जोरदार प्रहार चढवला. अर्थसंकल्पातील तरतूदी व नव्या योजनांची खिल्ली उडवताना त्यांनी निवडणूकीत जनतेला भुलवणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. यावेळी सैराट या चित्रपटातील झिंगझिंगझिंगाट या गाण्याचे विडंबन सादर करत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

त्यांनी सरकारवर प्रहार करताना सादर केलेले विडंबन असे , 

“उरात होतीये धडधड, सत्ता जायची वेळ आली,
डोक्यात गेलीये हवा, हि युतीची बाधा झाली...,
झालंय झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाटजी

चल क्लिनचीट देऊया, अन पैशे उडवूया,
उडताय रावसाहेब, पळतोय गिरीश, इलेक्शन आलया... !
आत्ता उतावीळ झालो, नेते फोडाया लागलो..,
तुझ्या नावाच मी कुंकू, माझ्या कपाळी लावलं,

अयोध्येवरून आलोया....., लै दुरून आलोया....,
शेतकरी आंदोलन करतोया, अन आम्ही मजा बघतोया !
समद्या पक्षात, म्या लै जोशात, रंगात आलोया..,

समद्या राज्याला झालीया, आपल्या युतीची हि घाई,
कधी होणार तू सेना, आमच्या आमदारांची आई.... !
रोजगार गेलाया.., शेतकरी कंगाल झालाया,

आता तराट झालुया, तुझ्या घरात आलूया..
लय फिरुन बांधावरून, कल्टी मारून आलोया ...!
आता इलेक्शन खेळूया..., अन २८८ जिंकूया...,
कारण मशीन आपलच हाय रर..!! काय चिंतेचं कारण न्हाय..!
झालंय झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाट,
झिंग झिंग झिंगाटजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com