NCP News : "जयंत पाटील भाजपमध्ये जाणार?" NCP चा सर्व्हे काय सांगतो? राष्ट्रवादीच्या नेत्याचा खुलासा

sharad pawar news
sharad pawar news
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज बैठक होती. आगामी निव़णुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विधानसभा आणि विधानपरीषदेच्या सदस्यांनी आपले मते या बैठकीत मांडली. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जंयत पाटील म्हणाले, अलीकडे काही सर्व्हे छापून येतात त्यात काही तथ्य दिसत नाही. आमच्या पक्षाने देखील खासगी स्तरावर काही निवडक मतदारसंघामध्ये सर्व्हे केले. त्या ठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी बळकट आहे. अनेक मतदारसंघात असे चित्र आहे.

काही असत्यावर आधारीत सर्व्हेच्या बातम्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत. मात्र राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेची माहिती मी बैठकीत दिली. राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात मोठा पक्ष आणि लोकांचा पाठींबा असलेला पक्ष म्हणून पुढे येत आहे.

sharad pawar news
Pharmacy Education: राज्यात विनाअनुदान तत्वावरील फार्मसीच्या 600 जागांना मान्यता

भाजपमध्ये जाणार आहात का?

संजय शिरसाट यांच्यापेक्षा माझी विश्वासहार्यता जास्त असेल. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर माझी प्रतिक्रिया विचारणे म्हणजे जरा जास्तच झाल, असे जयंत पाटील म्हणाले.  

जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील केवळ नाटक करत होते असंही शिरसाट यांनी म्हंटलं होतं.

sharad pawar news
Uniform Civil Code: समान नागरी कायद्याला पाठिंबा पण...; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दाखवला आरसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Dr. Abhay Patil and diliprao sarnaik
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com