जिजाऊंची समाधी सरकारकडून अंधारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

महाड : ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीबाबत सरकार उदासीन आहे. विजेचे बिल न भरल्याने या ठिकाणचा वीजपुरवठा नुकताच खंडित करण्यात आला होता.

समाधिस्थळाच्या व्यवस्थेबाबत सरकारी यंत्रणा हात वर करत असेल, तर ग्रामस्थ स्वत:हून देखभाल करण्यास तयार आहेत, असे येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. समाधिस्थळाचा वीजपुरवठा 7 तारखेला खंडित करण्यात आला होता. हा प्रकार वरचेवर घडत आहे. सध्या वीजपुरवठा पुन्हा सुरू केला असला तरी एकूणच देखभालीविषयी ग्रामस्थांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

पाचाड ग्रामस्थांतर्फे जिजाऊंच्या समाधीच्या दुरवस्थेबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. या गावात राजमाता जिजाऊंचा राजवाडा व समाधिस्थळ आहे. याच ठिकाणी त्यांचे निधन झाले. जिजामातेच्या या समाधिस्थळाकडे अनेक वर्षांपासून सरकारने दुर्लक्ष केले आहे. या जमिनीचा सातबारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने आहे. जमिनीच्या काही भागावर वन खात्याचा ताबा आहे; तर समाधिस्थळाचा ताबा पुरातत्त्व विभागाकडे आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, निधीचा तुटवडा यामुळे व्यवस्थित देखभाल होत नाही. येथील बाग पाण्याअभावी पूर्णपणे सुकली आहे. वीजबिल उशिराने भरले जात असल्याने नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जातो. याविरोधात पाचाड ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासन जागे झालेले नाही.

सरकारकडून समाधीची देखभाल होत नसेल, तर ती ग्रामस्थांकडे द्यावी, आम्ही तयार आहेत. निधी कमी पडला तर शिवप्रेमींकडून तो जमा करून देखभाल केली जाईल.
- रघुवीर देशमुख, पाचाडचे ग्रामस्थ

Web Title: jijau samadhi