शरद पवार उंचीने नव्हे तर कर्तृत्वाने ओळखले जातात - जितेंद्र आव्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad

उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्यावं असं म्हणत शरद पवार साहेबांची उंची मोजणाऱ्या शिवसेना आमदाराला जितेंद्र आव्हाड यांनी एक सल्लाही दिला.

शरद पवार उंचीने नव्हे तर कर्तृत्वाने ओळखले जातात - जितेंद्र आव्हाड

मुंबई - रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवर उदयनराजेंना (Udayanraje) घ्यावं आणि आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपद सोडावं असं म्हणत कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्यावर टीका केली होती. रयत शिक्षण संस्थेचं (Rayat Shikshan Sanstha) खासगीकरण होऊ नये, पात्र नसलेल्यांना बॉडीवर घेतल्याचं दु:ख वाटते असंही ते म्हणाले होते. शिवाय माझी उंची ६ फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा २ इंचाने मोठी आहे असेही ते म्हणाले होते. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी साहेबांवर टीका सहन केली जाणार नाही असे म्हणत महेश शिंदेंना तुमचा मेंदु कुठे आहे तपासा अशा शब्दात सुनावलं आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पवार साहेबांवर टीका केल्याने काहीजणांना आपण कर्तृत्ववान असल्याचं वाटतं. यामुळे टीव्ही, वृत्तपत्रात नावं यायला सुरुवात होते. कुठल्या गावचे, कोण महेश शिंदे, त्यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. मदन जगताप यांच्यासोबत ५० टक्के पार्टनरशिप असलेल्या या संस्थेची अवस्था काय आहे? क्लार्क, प्रोफेसरना पगार नाही, विद्यार्थ्यांच्या फीबद्दल माहिती नाही. तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचे काय झाले? असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला.

रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावरून आमदार महेश शिंदे यांनी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते. आणि शरद पवार साहेबांपेक्षा आपण दोन इंच लहान आहे असं म्हटलंत, पण पवारसाहेब उंचीने नाही तर कर्तृत्वाने ओळखले जातात.

हेही वाचा: 'मोदींच्या दौऱ्याआधीच पंजाब पोलिसांना होती आंदोलनाची माहिती'

रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशाने उभारली. बहुजनांच्या हितासाठी त्याची जशी वाढ झाली त्यापद्धतीने पाळेमुळे खेड्यात पोहोचवली त्यामागे पवार आहेत. ज्या माणसाबद्दल आपण बोलतोय त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती हे तरी तपासा, बोलायला तुम्ही कितीही बोलू शकता, कोण अडवणार, तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही, स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका, तुम्ही उंचीने किती आहात याबद्दल काही प्रश्न नाही, पण मेंदु कुठे आहे हे तपासून पाहा असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Web Title: Jitendra Avhad Reaction On Shivsena Mla Mahesh Shinde Statemant About Sharad Pawar And Udayanraje

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top