
राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलायं; जितेंद्र आव्हाड
मुंबई: जातीय तेढ वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सुपारी घेतलीय. राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर (Johnny Lever) सापडलाय असं लोक बोलतायत अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. सुळे घुसले की किती दुखतं ते बघा. गरगर फिरवीन काय मालमत्ता आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला.
हेही वाचा: 'मदतीच्या नावाखाली चित्रा वाघ राजकीय पोळी भाजून घेतात'
ते म्हणाले, राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्यातून जातीय तेढ निर्माण करतात हे महाराष्ट्राला माहीत आहे. महाराष्ट्र खूप मोठ्या मनाचा आहे. तुम्हाला फुलासारखं बाहेर काढलं. काल घरातून बाहेर पडल्यापासून ठाणे पर्यंत पोहचेपर्यंत तुम्हाला फुलासारखं आणले. ठाणेकरांच्या गाड्या अडवण्यात आल्या. ठाण्यात ट्राफिक जाम होतं. पण खबरदारीची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था दिली. एवढी सुरक्षाव्यवस्था शरद पवार, मुख्यमंत्र्यांनाही दिलेली पाहिली नाही. काल ठाण्यातील ट्राफिक कमी करण्यासाठी चार तास लागले याविषयी बोलणार नाही, कारण तुम्ही महान आहात असा टोलाही लगावला. हा महाराष्ट्र सरकारचा मोठेपणा आहे मात्र त्यांची टिंगल राज ठाकरे करतात असे ते म्हणाले.
हेही वाचा: ''मविआनं खोटी माहिती देण्यासाठी इको सिस्टिम तयार केलीयं''
समाजामध्ये राज ठाकरे यांच्याविषयी अस्वस्थता आहे. तुम्ही सर्वांची नक्कल करू शकता मात्र माझी नक्कल करू शकला नाही. राज यांनी आता स्टॅंडअप काॅमेडियनची जागा घ्यावी. तुम्हाला महाराष्ट्राच जॉनी लिव्हर ही पदवी देईल. सुप्रिम कोर्टाच्या नियमानुसार १०० मीटरच्या आजूबाजूला स्पिकर लावू नये. तुमच्या कार्यकर्त्यांना माहित नव्हत का आजूबाजूला दोन शाळा आहेत असाही सवाल त्यांनी केला.राज ठाकरे यांच्यात जातीयवाद ठासून भरलाय असेही ते म्हणाले.
Web Title: Jitendra Awhad Criticism On Raj Thackeray Speech Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..