
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली आहे
दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है..; आव्हाडांचा शायरीतून मनसेला टोला
सध्या राजकीय वातावरणात मनसे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा रंगली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरून मनसेने मागील काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली आहे. यातून त्यांनी मनसेला टोमणा मारला आहे. (Jitendra Awhad on MNS)
हेही वाचा: आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंना वाटते की ते बाळासाहेब होऊ शकतात, म्हणून...
मंत्री आव्हाड यांनी ट्विटमधून एक शायरी पोस्ट केली आहे. ते म्हणतात, शत्रू जे काम करत नाहीत ते काम मित्रांनी केले आहे. आयुष्यभर केवळ त्रास दिला आहे, असं म्हणत त्यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हणटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, काल एका मुलाखतीत मंत्री आव्हाड यांनी मनसेला धारेवर धरलं होतं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अचानक वाटायला लागले की ते बाळासाहेब होऊ शकतात. यामुळेच त्यांनी भोंग्यांचा विषय उकरून काढला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. कितीही केले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाहीत, असंही आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: वंचित-काँग्रेसची आघाडी?, कॉंग्रेस नेत्यासोबत आंबेडकरांची गुप्त बैठक
Web Title: Jitendra Awhad Criticized To Raj Thackeray With Shayari After Loudspeaker Stop On Temple
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..