किणी प्रकरणाची आठवण करून देत आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा I Jitendra Awhad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad vs Raj Thackeray

'किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठं-कुठं जावं लागलं होतं, हे आमच्या स्मृतीत आहे.'

किणी प्रकरणाची आठवण करून देत आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीमुळं बुधवारी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक आणि पाठोपाठ शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीनं आणलेली टाच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीय मूल्य प्राप्त झालं होतं.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. यावरून आता मनसेनं जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या भेटीवर आता मनसेनं प्रतिक्रिया दिलीय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी 'दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा' अशा आर्त हाका ऐकू आल्या', असं म्हणत खोचक टोला लगावलाय. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलंय. मनसेच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

हेही वाचा: 'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मनसेनं प्रतिक्रिया दिलीय. असं म्हणतात की, विस्मृती ही देवानं दिलेली माणसाला सर्वात मोठी देणगी आहे. किणी खून प्रकरणात (Ramesh Kini Case) स्वर्गीय बाळासाहेबांना कुठं-कुठं जावं लागलं होतं, हे आमच्या स्मृतीत आहे, असं सांगत त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) जोरदार टोला लगावलाय.

हेही वाचा: 'काश्मीर हिंसाचाराचा मी साक्षीदार, भाजपवर आरोप करणं चुकीचं'

रमेश किणी हत्या प्रकरण आणि राज ठाकरे

1996 मध्ये झालेल्या रमेश किणी या व्यक्तीच्या हत्येसंदर्भात राज ठाकरेंवरही संशयाचं बोट दाखवलं गेलं होतं. त्यांची चौकशीही झाली. पुढं ते या सर्वातून निर्दोष सुटले. मात्र, राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीस या प्रकरणामुळं धक्का बसला.

Web Title: Jitendra Awhad Criticizes Raj Thackeray Over Ramesh Kini Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..