
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची कीव येते - राज ठाकरे
'महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर नवा कॉमेडियन जन्माला आला'
काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उत्तरसभा ठाण्यात पार पडली. येथे केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. या भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात दिसत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भाषणाचा मंत्री आव्हाडांनी खरपूस समाचार घेतला आहे.
हेही वाचा: रंग बदलणारे व्हायरस; जयंत पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मंत्री आव्हाड यांनी ट्विट करत टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणतात, खरंतर इतक्या खालच्या पातळीवर मला उतरायचं नव्हतं. शब्दांची कोटी आम्हांलाही करता येते, टिंगल टवाळी आम्हालाही करता येते. पण इतक्या खालच्या पातळीवर खरंतर उतरायचं नसतं. आपण उतरू शकता तर आम्ही पण उतरू शकतो राज ठाकरे. राज ठाकरे यांनी माझी नक्कल केली आहे. यातून एक गोष्ट चांगली झाली की, देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते नंतर कोणीच देऊ शकलं नाही. आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा! जश्यास तसे हि संत तुकारामाची शिकवण, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


हेही वाचा: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर
दरम्यान, काल ठाणे येथे केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना धारेवर धरलं होतं. आव्हाड म्हणजे नागानं फणा काढावा असे आहेत. कधीही डसू शकतात. अशावेळी फक्त इतकचं म्हणेन की, ये शेपटी धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची कीव येते, अशी सणसणीत टीकाही त्यांनी केली होती. राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर टीका केली.
Web Title: Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray Statement In Thane Speech
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..