मला मारलं तर लफडं नको, म्हणून मीच सकाळी घर सोडलं - आव्हाड

NCP Leader Jitendra Avhad criticizes BJP Government
NCP Leader Jitendra Avhad criticizes BJP Government

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आव्हाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. आव्हाड यांनी पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी केली होती. (Jitendra Awhad) त्यानंतर आव्हाड यांनी आखणी एक विधान केलं आहे.

ओबीसी समाजाबाबत विधान केल्याने अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी गंभीर आरोप केले आहेत. "बुधवारी माझ्या घरावर मोर्चा येणार असल्याचं समजतंय. त्यासाठी पुण्यातून दोन बस मागवण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा.., असं आव्हाड यांनी म्हटलं. (Jitendra Awhad on OBC) यानंतर त्यांच्या घरावर मोर्चा आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं. याच दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनासाठी देखील कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

मला मारतील.. काही लफडी नको!

या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. राजकारणात असे मोर्चे येतात. मी ही असे मोर्चे काढले आहेत. जेव्हा मोर्चे काढायचे होते तेव्हा हे रथयात्रा काढत होते. मी अश्या मोर्च्यांना घाबरत नाही. माझ्यावर कार्यकर्ते प्रेम करतात,म्हणून ते घराबाहेर जमले आहेत, असं आव्हाड म्हणाले.

मी पोलिसांना इशारा दिला नाही. काही अनुचित प्रकार नको मी घरातून निघून आलो. मला मारतील.. काही लफडी नको म्हणून मीच सकाळी नऊ वाजताघर सोडलं, असं स्पष्टीकरण आव्हाडांनी दिलंय.

काय आहे वाद?

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने "सन्मान सावित्रीच्या लेकींचा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आव्हाडांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

''मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण, लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. त्यावेळी महार आणि दलित लढायला तयार होते. कारण, ओबीसींना कधीच लढायचं नसतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. त्यांना हे माहिती नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात. त्यामुळे OBC वर माझा फारसा विश्वास नाही, असं आव्हाड म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com