राष्ट्रवादीची बैठक संपली, OBC आरक्षणाची सूत्र भुजबळांच्या हाती

Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawaresakal

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी आढावा घेतल्याचं कळतंय. तर मंत्र्यांच्या कामाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. (OBC Reservation Latest news)

राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बाळासाहेब पाटील, जयंत पाटील, नरहरी झिरवळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, संजय बनसोड, राजेंद्र शिंगणे पोहचले. यासोबतच छगन भुजबळ आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक देखील उपस्थित होते. (NCP meeting on OBC reservation)

ओबीसी आरक्षणाशिवाय निडवडणुका नकोच - राष्ट्रवादी

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, ही राष्ट्रवादीने भूमिका घेतली आहे. यासंदर्भात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, अशी भूमिका मांडण्यात आली. यासाठी कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. (Nawab Malik)

राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात कोविद रुग्णसांख्य वाढत हे

आमचे जानेवारीत शिबीर होते

इतर कार्यलरम स्थगित केले

कुठेही गर्दी होईल असे कार्यक्रम मंत्री नेतेघेऊन नये

मंत्री पालकमंत्री, संप्रकमंत्री जिल्ह्यात जाऊन आढावा घेतील

आगामी पक्षणतर्गत निवडणूक साठी जो कार्यक्रम आहे त्याची चर्चा झाली

आगामी निवडणूक तयारी करणार

पण ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक नको

ऑन स्वबल निवडणूक

स्थानिक संघटन ठरवेल कोणाबरोबर आघडी करायची की नाही

प्रत्येक पक्षाला तो अधिकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com