Jitendra Awhad | एसटी कामगारांचे पवार साहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Discussion on Jitendra Awhads selection as Guardian Minister of Solapur

पवार साहेबांचे एसटी कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे...

जवळपास महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, यासाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांनी आंदोलन हाती घेतलं आहे. महाविकास आघाडी सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील बैठका संपूर्ण निष्फळ ठरल्याने सध्या बसेस कमी धावतायेत. सरकारने कामगारांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचं निलंबन केलंय.

दरम्यान, सोमवारी (ता.२२) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. एसटी कामगारांचा संप मागे घेण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार का, याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलंय. पवारांनी यात लक्ष्य घालून संपावर तोडगा काढण्यासाठी काही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री देखील प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकारचे गृहनिर्माण मंत्री नेते जितेंद्र आव्हाड यांनी शहर पवारांचे एसटी कामगारांशी जिल्हाळ्याचे संबंध असल्याचं म्हटलंय. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय? असा प्रश्न उपस्थित केलाय.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. आणि जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे. आणि तेच काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब करतील.

ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत कै. गोपीनाथ मुंडेसाहेब मंजूर करून घ्यायचे. मुंडे साहेबांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती.

गेल्या 40 वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?

loading image
go to top