Jitendra Awhad and Devendra Fadnavis
Jitendra Awhad and Devendra Fadnavis

Jitendra Awhad : फडणवीसांच्या टीकेला आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले, मी कट्टर हिंदू...

Published on

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात दंगली होतील, असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा समाजाचा आणि रामभक्ताचा अपमान असल्याचंही फडणवीस म्हणाले. यावर आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad and Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दंगली होतील असं 'त्यांचं' वक्तव्य; फडणवीसांनी घेतला राष्ट्रवादीच्या नेत्याचा समाचार

आता मी बोललो नाही, तर महाराष्ट्राला कळणार नाही. माणसाच्या मृत्यूपेक्षा कशाला किंमत असते का? आपण लढायला निघालो तर सत्य सांगावच लागतं. मला काही जन्मठेप होणार नाही. यावरही आणखी दोन दिवस जेलमध्ये जाईल. रामनवमी आणि हुनमान जयंती ज्या पद्धतीने केलं जायचं, रामाची, हनुमानाची पूजा व्हायची, हे मी घरात अनुभवल्याचं आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad and Devendra Fadnavis
Covishield Upadate: कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय पण चिंता नको! अदर पुनावलांनी दिली महत्वाची माहिती

आव्हाड म्हणाले की, मी असो बोललो की, सध्या परिस्थिती अशी तयार करण्यात येते की, रामनवमी-हनुमान जयंती हे उत्सव केवळ दंग्यांसाठीच आहे, हे दाखवलं जात. यामुळे हे उत्सव बदनाम होत आहे. मी हिंदू आहे, कट्टर हिंदु आहे. वासुदैव कुटुंबकम मानणारा हिंदू असल्याचंही आव्हाड म्हणाले.

श्रीराम आपल्या आईचं ऐकणारे होते, आपल्या भावाला सन्मानित कऱणारे राम सर्वांना माहित आहेत. हे उत्सव समाजात एकता निर्माण करतात. पण समाजात विष पेरलं जात आहे. हे व्हायला नको. समाजात द्वेष परवल्याने देशाचं नुकसान होतं, असंही आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com