Job Opportunity : सरकारी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

नोकर भरतीवरील बंदी उठविण्याचा जीआर राज्य सरकारकडून जारी
job opportunities
job opportunities

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार सरकारी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नोकर भरतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सोमवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीने आज वित्त विभागाने जीआर जारी केला आहे. त्यानुसार, शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

तर, ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून या भरतीची मुभा देण्यात आली आहे.

नोकरभरतीवरील निर्बंधांतून देण्यात आलेली ही सूट फक्त स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.

त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तर, ३० सप्टेंबरच्या जीआरनुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा होती. अन्य संवर्गातीलही पूर्ण पदभरतीचा मार्ग आजच्या जीआरने मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com