मोठा दिलासा! MPSC कडून संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चे वेळापत्रक जाहीर | Joint Mains Exam 2020 Schedule Announced by MPSC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

मोठा दिलासा! MPSC कडून संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चे वेळापत्रक जाहीर

मुंबई - महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले आङे. यामुळे मुख्य परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या एमपीएससी परीक्षार्थांनी मोठा दिलासा मिळाला आहे. (MPSC exam news in Marathi)

हेही वाचा: शिंदे-फडणवीस सरकारचा खडसेंना दुहेरी धक्का; 'त्या' कारभाराची होणार चौकशी

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे २९ जानेवारीला होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने जाहीर केले होते. या याचिका तीनही खंडपीठांकडून फेटाळण्यात आल्याने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक एमपीएससीने जाहीर केले.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ ही परीक्षा ११ सप्टेंबरला, पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा २५ सप्टेंबरला, राज्य कर निरीक्षक पदासाठीची परीक्षा १५ ऑक्टोबरला, सहायक कक्ष अधिकारी पदासाठीची परीक्षा १६ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्य परीक्षा न्यायालयीय प्रक्रियेत अडकल्याने परीक्षा लांबली होती. परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी परीक्षार्थींकडून वारंवार करण्यात होती.

Web Title: Joint Mains Exam 2020 Schedule Announced By Mpsc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..